प्रा.नानाजी रामटेके यांना राज्यस्तरीय पुरस्कार

0
प्रा.नानाजी रामटेके  यांना राज्यस्तरीय पुरस्कार


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता


           डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र ( रत्नागिरी ) शाखा जिल्हा नागपूर व जिल्हा चंद्रपूर आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सांस्कृतिक भवन उरुवेला* कॉलनी, वर्धा रोड नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र ( रत्नागिरी) या विचारमंचाच्या द्वितीय वर्धापन दिन व राज्यस्तरीय कविसंमेलनात प्रा. नानाजी रामटेके यांना त्यांच्या सामाजिक ,साहित्यिक शैक्षणिक , धार्मिक ,कला आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार - २०२२ ने सन्मानित करण्यात आले.
       या बहुमान पुरस्काराबद्दल मनोज जाधव राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष , भावना खोब्रागडे राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्षा, विनोद जाधव कोकण विभागीय अध्यक्ष , जगदीश राऊत नागपूर विभागीय अध्यक्ष , अर्चना चव्हाण नागपूर जिल्हा सचिव , अनिरुद्ध शेवाळे, सोपानदेव मशाखेत्री गडचिरोली जिल्हाध्यक्ष , सुनिता तागवान जिल्हा सचिव , रविंद्रजी जनवार सचिव गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूर , नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष , माला मेश्राम जिल्हा उपाध्यक्षा ठाणे, छाया जांभुळे कार्याध्यक्षा ,  विजय भगत प्रसिध्दी प्रमुख चंद्रपूर, प्रा. प्रशांत खैरे, चंद्रपूर जिल्हा सचिव, अपेक्षा खोब्रागडे संपर्क प्रमुख चंद्रपूर जिल्हा यांनी अभिनंदन केले आहे.  
        या पुरस्काराबद्दल प्रा. नानाजी रामटेके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !