धारदार शस्त्राने भोसकून इसमाची हत्या
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
तब्बेत बरी नसलेल्या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी मोटरसायकल दिली नाही म्हणुन राग अनावर झालेल्या व्यक्तीने एका ५५वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने भोसकुन हत्या केल्याची घटना तालुक्यातील कोंडेगाव येथे घडली.या घटनेत घनशाम सहारे याचा मृत्यू झाला असुन त्याचा मुलगा शक्ती घनश्याम सहारे वय २४वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तर आरोपी तुकाराम नारायण भोयर वय ५५वर्ष याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान घटनास्थळाला पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी व उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी भेट देऊन पाहणी केली.आरोपी नारायण भोयर याच्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याने मृतकाकडे त्याला दवाखान्यात नेण्यासाठी मोटरसायकलची मागणी केली.मात्र मृतकाने ती दिली नाही.यावरुन दोघात वाद झाला. हा वाद मृतकाचा मुलगा शक्ती याने सोडविला.दरम्यान आरोपी आपल्या घरी गेला व धारदार शस्त्र आणुन त्याने घनशामच्या पोटात खुपसले.शक्ती हा मधात पडल्यानंतर आरोपीने त्याच्यावर सुध्दा वार करुन त्याला गंभीर जखमी केले.या घटनेत घनशाम सहारे याचा मृत्यू झाला तर जखमी शक्तीला उपचारासाठी नागपुरला पाठविण्यात आले.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक रवींद्र परदेशी व उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलीस करीत आहे.
बातमी व जाहिराती करीता संपर्क साधा
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
9404813358 /7972434925

