वायगाव रस्त्यावरील खड्डे केव्हा बुजविणार?
*जिल्हा प्रतिनिधी प्रवीण तिवाडे*
चामोर्शी: तालुक्यातील येनापूर येथून तीन किमी अंतरावर वायगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर पावसामुळे सर्वत्र खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
खड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, आता जागोजागी डांबरीकरण उखडलेले आहे. 'खड्डयात रस्ता की, रस्त्यात खड्डा' हेच कळत नाही.
आंबोली येथील जिल्हा परिषद
शाळेसमोर रस्त्याचे मोठ्या खड्ड्यात रुपांतर झाले आहे. या रस्त्याने आंबोली, वायगाव येथून विद्यार्थी सायकल, पायी वा मिळेल त्या साधनाने ये-जा करतात. मात्र, या दुरवस्थेत असलेल्या रस्त्याचा विद्यार्थी वर्गास अत्यंत त्रास होत आहे.
