आष्टी अप्पर तहसीलच्या मुद्द्यावर राजकीय खळबळ! संघर्ष समितीची सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट!

0
 आष्टी अप्पर तहसीलच्या मुद्द्यावर राजकीय खळबळ!  संघर्ष समितीची सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट!


आष्टी : आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला आता राजकीय वळण मिळताना दिसत आहे. शासनाच्या निर्णयात आष्टीऐवजी घोट येथे अप्पर तहसील कार्यालयाचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर आष्टीच्या संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.


या भेटीदरम्यान आष्टी अप्पर तहसीलच्या मागणीवरून झालेला अन्याय, शासनाचा निर्णय आणि स्थानिक नागरिकांच्या भावना यावर चर्चा करण्यात आली. मात्र, या घडामोडींमुळे स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याबाबत संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, आष्टी हा स्थानिक प्रश्न असताना संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदारांची भेट घेण्याऐवजी चंद्रपूर जिल्ह्यातील नेते सुधीर मुनगंटीवार यांची भेट का घेतली? स्थानिक आमदारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला का? की शासनदरबारी प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मदत घेण्यात येत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आष्टीचा अप्पर तहसीलचा प्रस्ताव बाजूला ठेवून घोटचा समावेश करण्यात आल्याने आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. या निर्णयाविरोधात संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, आष्टी येथेच अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी कायम ठेवली आहे. आष्टी येथे पत्रकार परिषद घेऊन मागणी केली आहे यावेळी समीतीचे अध्यक्ष शरद कोलेटीवार , सचिव दिलीप बारसागडे, अनिल आलूरवार, पराग गोनपल्लीवार, संजय पंदिलवार, यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते 

आता या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे काय भूमिका घेतात? संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची आमदारांबाबत खरोखरच नाराजी आहे का? तसेच सुधीरभाऊ मुनगंटीवार या प्रश्नावर शासनाकडे कोणता पाठपुरावा करणार? याकडे आष्टी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आष्टीच्या अप्पर तहसीलचा प्रश्न आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनणार का? हा खरा प्रश्न आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !