आष्टी येथे संपन्न झाले एक दिवसीय विपश्यना साधना शिबिर
आष्टी (अशोक खंडारे ):- धम्मदिप बौद्ध समाज मंडळ आष्टी च्या वतीने महाबोधी बुद्धविहार आष्टी येथे आज दिनांक 22/11/2026 रोज रविवारला एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले . यामध्ये एकूण ४५ साधक/ साधिकांनी विपश्यना साधना शिबिरात सहभाग घेतला . सदर शिबिरात नागपूर, चंद्रपूर, बल्लारपूर, येनापूर, गोंडपिपरी, बोरी, डोंगरगाव, गडचिरोली व बहूसंख्येने आष्टी येथील साधक, साधिकांनी विपश्यना साधनेचा लाभ घेतला .
या शिबिराला चिकाटे मॅडम सहाय्यक आचार्य म्हणून मार्गदर्शन केले शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकाश डोर्लीकर अध्यक्ष धम्मदिप बौद्ध समाज मंडळ आष्टी, उपाध्यक्ष राहूल फुलझेले मा सहास गेडाम सर, नंदाताई डोर्लीकर, रंजना दुर्गमवार , संगिता कांबळे मॅडम,. मायाताई डोर्लीकर मॅडम,शेरेकर सर, बावणे सर, वर्षा मेश्राम मॅडम, इत्यादी साधकांनी सहकार्य करून एक दिवसीय विपश्यना साधना शिबिर यशस्वी केले .

