वैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ४ ट्रॅक्टरवर आष्टी पोलिसांची कारवाई
२० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी अटकेत, २ पाहिजे आरोपी
वैनगंगा वार्ता १९
आष्टी (ता. चामोर्शी), दि. २७ नोव्हेंबर - वैनगंगा नदीपात्रातून विनापरवाना रेती उत्खनन करून विक्रीसाठी चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळीवर आष्टी पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत ४ ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ ब्रास रेती असा एकूण २० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मौजा आष्टी ते चपराळा रोडवरील पेपरमिल रोड, लाकडीघाट येथून काही इसम वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आष्टी पोलीस ठाण्याचे पथकाने दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.१० वाजता मौजा ईल्लूर गावाजवळील एमएसईबी पॉवरहाऊसजवळ, वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सापळा रचला.
त्यावेळी ४ ट्रॅक्टर-ट्रॉली रेतीने भरून येताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता, त्यांच्याकडे रेती उत्खनन व वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता.
अटक केलेले आरोपी :
१) संदीप भाऊजी खोबरे, वय ३८, रा. ईल्लूर, ता. चामोर्शी
२) संजय तुळशीराम शेरकी, वय २७, रा. तारसा, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
३) विनोद मुरलीधर चौधरी, वय २९, रा. तारसा, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
४) दिलीप मारुती पेरमवार, वय ४२, रा. ठाकरी, ता. चामोर्शी
पाहिजे आरोपी :
५) चेतन कारेकर, रा. आष्टी
६) संजय पंदीलवार, रा. आष्टी
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कपिल मुरलीधर आगलावे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अप.क्र. /२०२६ कलम ३०३ (२), ३(५) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलीस करीत आहेत.

