आष्टी अप्पर तालुका निर्माण करण्यासाठी शासनाने केला अन्याय

0
आष्टी अप्पर तालुका निर्माण करण्यासाठी शासनाने केला अन्याय! 

३० नोव्हेंबर पासून होणार चक्काजाम आंदोलन!



आष्टी ( गडचिरोली) -  जिल्ह्यातील आष्टी हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून चामोर्शी तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव आहे. गेल्या ४० वर्षांपासून आष्टी येथे तालुका निर्माण करण्याची मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात नवनिर्मित तालुक्यांची निर्मिती करताना आष्टीचे नाव अग्रभागी होते. मात्र तेव्हा राजकीय दबावामुळे मुलचेरा तालुक्याची निर्मिती करण्यात आली आणि आष्टीवर अन्याय झाला.

त्यानंतर आष्टी तालुका निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यासाठी वारंवार मुंबई येथे मंत्रालयात जाऊन आष्टी तालुका निर्मिती प्रशासकीय दृष्टीने कशी सोयीची आहे, हे दाखवून देण्यात आले.

शासनाने महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने नवीन अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली. भौगोलिक व्याप, लोकसंख्या, नागरीकरण, आवश्यक सोयी या सर्व निकषांत आष्टी बसत असल्याने शासनाने चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे अप्पर तहसील मंजूर केले. मात्र २२ सप्टेंबर २०२६ रोजी अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यान्वित आदेशात आष्टी नाव वगळण्यात आले. त्यामुळे आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

आष्टी या गावचे तालुक्यापासूनचे अंतर ३५-४० कि.मी. आहे, तसेच परिसरातील अंतर ५५ कि.मी. आहे. आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय आहे, तीन महाविद्यालये, दोन राष्ट्रीयकृत बँक, ८-१० शाळा व मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यासाठीचे सर्व निकष पूर्ण करीत असूनही आष्टी महसूल मंडळाचा समावेश दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी घोट अप्पर तहसील निर्मितीचा आदेश काढून आष्टीवर अन्याय करण्यात आलेला आहे. जेव्हा की आष्टीचे महसूल मंडळ घोटला जोडण्यात आले आहे तेव्हा जनतेला आवागमन करण्यासाठी कोनतेही साधन नाही तरीही हा घाट का घालण्यात आला हा प्रश्न अनुत्तरित आहे 

या निर्णयाच्या विरोधात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शासनाच्या निर्णयाविरोधात बाजारपेठ आणि चक्काजाम आंदोलन आष्टी परिसरातील ४०-५३ गावातील नागरिकांनी करण्याचे ठरविले आहे.
पोलीस स्टेशन आष्टीच्या माध्यमातून निवेदन देऊन शासनास कळविले आहे तेव्हा शासनाने तात्काळ जुना आदेश कायम ठेवून आष्टीचे नाव अप्पर तालुका म्हणून कायम ठेवून आष्टीचे नाव घोषित करण्यात यावे अशी मागणी आष्टी परिसर ५० गावातील नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन मागणी केली ऊ या पत्रकार परिषदेला पराग गोनपल्लीवार, विजय बहिरेवार, वसंत चौधरी, जितेंद्र हुलके, राकेश बेलसरे, अनिल आलूरवार, नंदा कुळसंगे, विद्या जुनघरे, रेशमा फुलझले, पुणम बावणे, वर्षा कलाक्षपवार, संतोष बारापात्रे, कपील पाल, छोटू दुर्गे, गणपत येलमुले, विजय बद्दलवार, रमेश बोरकुटे, मुकेश नारंग, इंदिरा बोरकुटे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !