शेतकऱ्यांच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया, भुमी संपादित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात येईल

0

शेतकऱ्यांच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया, भुमी संपादित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात येईल 



वाघोली येथील शेतकऱ्यांशी भुसंपादनाबाबत समितीची बैठक 

गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर (जिमाका) — जिल्ह्यातील पोलाद प्रकल्पांसाठीच्या प्रस्तावित भूसंपादनासंदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाघोली येथील शेतकरी व स्थानिक रहिवाशांशी जिल्हाधिकारी कार्यालयात काल तीन तास चर्चा केली. बैठकीत शेतकऱ्यांनी भूसंपादनासंदर्भातील मांडलेल्या शंका, हरकती आणि त्यांच्या मनातील संभ्रम समितीने ऐकून घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशाद्वारे ही समिती गठित केली आहे. बाधित शेतकऱ्यांच्या समस्या व हरकती जाणून घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी समितीकडे सोपविण्यात आली आहे.

 शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनेच भूसंपादनाची पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल आणि संपादित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.


कायदेशीर मार्गाने प्रश्न मांडा – पोलीस अधीक्षक एम. रमेश

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या व समस्या कायदेशीर मार्गाने प्रशासनासमोर मांडाव्यात. रस्ते अडविणे किंवा कायदा हातात घेणे टाळावे. आपल्या कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रशासन सदैव तयार असून, संवादातून प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले.

 यावेळी अहेरीचे अपर जिल्हाधिकारी संजय आसोले, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, मुद्रांक जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख विजय भालेराव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री गिरी आणि समितीचे इतर सर्व सदस्य अधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !