गडचिरोली येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' उत्साहात
एकाच छताखाली २५६१ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ वितरित
गडचिरोली (अशोक खंडारे):-
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे जयंती निमीत्य 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' स्थानिक सुमानंद सभागृहात २२ जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या भव्य शिबिरामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी तालुक्यातील एकूण २५६१ पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ, प्रमाणपत्रे आणि धनादेशांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभेचे आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे , पोलीस अधीक्षक एम. रमेश, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, धानोराचे तहसिलदार गणेश माळी, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे, उपायुक्त (नपाप्र) श्रीमती अर्चना मेंढे, संवर्ग विकास अधिकारी अनिकेत पाटील
पंचायत समिती गडचिरोली आणि गडचिरोलीचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी सभापती मारोतराव ईचोळकर यांनी गायलेल्या 'महाराष्ट्र गीता'ने झाली. या शिबिराला गडचिरोली, चामोर्शी आणि धानोरा परिसरातील हजारो लाभार्थी उपस्थित होते.
विविध विभागांमार्फत २५६१ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले
शिबिरामध्ये विविध सरकारी विभागांनी तत्परतेने काम करत लाभार्थ्यांना सेवा दिल्या. त्यामध्ये
महसूल विभाग 1742,
पुरवठा विभाग 103,
संजय गांधी विभाग 84,तालुका आरोग्य विभाग 71, नगर परिषद विभाग 58,
उप अधिक्षक भुमी अभिलेख 56, पंचायत समिती 124, एकात्मिक बाल विकास सेवा 63, तालुका कृषि विभाग 163, वन विभाग 19, सहायक दुय्यम निबंधक विभाग 24, उमेद 29,
महावितरण कंपनी 22, बँक विभाग 03 असे विभाग निहाय कामे एकाच छताखाली करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम. यांनी केले संचालन नायब तहसीलदार वनिशाम येरमे व अरविंद शेंडे यांनी केले तर आभार गडचिरोली चे तहसीलदार सागर कांबळे यांनी मानले हे अभियान यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार चंदू प्रधान, ज्ञानेश्वर ठाकरे, एस.पी. शेख, अल्पेश बारापात्रे, देवेंद्र वाळके, गिरीश नरोटे यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी आणि विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

