महिलेचा पाठलाग करीत थेट घरात घुसलेल्या इसमाविरद्ध पोलीसांनी केला गुन्हा दाखल

0

महिलेचा पाठलाग करीत थेट घरात घुसलेल्या इसमाविरद्ध पोलीसांनी केला गुन्हा दाखल



 बल्हारपूर : बल्हारपूर शहरातील बामणी परिसरात एका ३० वर्षीय महिलेचा सातत्याने पाठलाग करून अखेर तिच्या घरात घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बल्हारपूर पोलिसांनी शोएब कामीलअली सय्यद (वय ३५), रा. संत तुकाराम हॉल परिसर, बल्हारपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला यापूर्वी एका खासगी कंपनीत काम करत होती. त्याच ठिकाणी आरोपीही कार्यरत होता. नोकरी सोडल्यानंतरही आरोपीने महिलेचा विनाकारण पाठलाग सुरू ठेवला. ती ये-जा करत असलेल्या रस्त्यावर थांबून तिचा मार्ग अडवणे, कुठे जात आहे याची विचारणा करणे आणि सतत त्रास देणे, असे प्रकार तो वारंवार करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


यापूर्वी महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपीला समज देण्याचाही प्रयत्न केला होता.

१३ जुलै रोजी पीडित महिला आपल्या कुटुंबीयांसह चंद्रपूर वरून परतत असताना आरोपीने बोलेरो वाहनातून त्यांच्या स्कॉर्पिओचा पाठलाग केला. या दरम्यान आरोपीने वाहनाच्या खिडकीतून बिअरची बाटली दाखवत धमकीचे कृत्य केले.

रात्री कुटुंबीय घरी आल्यानंतर काही वेळाने आरोपी थेट घरात घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. स्वयंपाक घरालगतच्या बेडरूममध्ये बेडखालून बाहेर येताना तो पीडितेच्या आईच्या निदर्शनास आला. आईने जाब विचारताच आरोपीने तिला धक्का देऊन घरातून पळ काढले. आरोपीने अंगणातील शिडीच्या साहाय्याने छतावरून घरात प्रवेश केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बल्लारपूर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !