गडचिरोली येथे सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांचा जाहीर सत्कार
गडचिरोली (अशोक खंडारे)-- येथील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते तथा वीर बाबुराव स्मारक समितीचे संस्थापक वसंतराव कुलसंगे यांचा 75 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल दि .४ जुलै ला विविध सामाजिक संघटनांच्या वतीने चांदेकर भवन येथे जाहीर सत्कार करण्यात आला.
जेष्ठ पत्रकार तथा सामजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेाते. सत्कारमुर्ती वसंतराव कुलसंगे त्यांच्या सुविद्य पत्नी पोर्णिमा कुलसंगे, गांधी विचार मंचाचे प्रकाश अर्जुनवार, बाबुराव मडावी स्मारक समितीचे गुलाबराव मडावी, जन अधिकार मंचचे मनोहर हेपट, संविधान फाऊंडेशनचे गौतम मेश्राम, कर्मचारी संघटनेचे नेते देवानंद फुलझेले, महाअंनिसचे विठ्ठलराव कोठारे, जेष्ठ कार्यकते तथा संशोधक डॉ.सुशिल कोहाड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
या प्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन वसंतराव कुलसंगे यांचा आणि साडीचोळी देऊन पोर्णिमा कुलसंगे यांचा सत्कार करण्यात आला व केक कापुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी वसंतराव कुलसंगे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना एक ध्येयवेडा कार्यकर्ता असे संबोधले. क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांचे जिवनकार्य समाजापर्यंत पोहचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचा उल्लेख मान्यवरांनी यावेळी केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी हंसराज उंदिरवाडे, कुणाल कोवे, अमरसिंग गेडाम, मनोहर अमनपटलावार, उपेंद्र रोहणकर, प्रदिप भैसारे, निशा कुमरे, कवडुजी उंदिरवाडे, हरिदास कोटरंगे, वर्षा राजगडे, देवराव आलाम, निलकंठ कुमरे, विजय देवतळे, वासुदेव कन्नाके, हर्षवर्धन कुलसंगे यांचेसह अनेक कार्यकते उपस्थित होते.
कार्यकमाचे प्रास्ताविक व संचालन विलास निंबोरकर यांनी तर आभार प्रदर्शन गौतम मेश्राम यांनी केले.

