एका इसमाचा नाल्याच्या काठावर शव आढळल्याने परिसरात एकच खळबळ

0
एका इसमाचा नाल्याच्या काठावर शव आढळल्याने परिसरात एकच खळबळ







भामरागड, दि. २३ : भामरागड तालुक्यातील मौजा तुमरकोठी येथे आज दि  २३ जुलै गुरुवारला सकाळी एका ४५ वर्षीय इसमाचा शव नाल्याच्या काठावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतकाचे नाव कोमटी मासू वड्डे वय ४५, रा. तुमरकोठी असे आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास मरकणार-तुमरकोठी मार्गावरील नाल्याच्या पाण्याच्या काठावर मृतदेह आढळून आला. ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बागडे यांनी तातडीने पथक घटनास्थळी रवाना केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
सध्या जिल्ह्यात साधारण पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

तुमरकोठी हे गाव भामरागड तालुका मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असून छत्तीसगड सीमेवरील दुर्गम भागात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !