गडचिरोली जिल्ह्यासह आष्टी येथे कडकडीत बंद
आष्टी (अशोक खंडारे):- दिल्ली येथील जंतर - मंतर सोनम वांगचुक यांना शासनाने ताब्यात घेतल्यानंतर तेथील विद्यार्थी आंदोलकांवर निर्दयपणे, अमानवी लाठीचार्ज केला गेला त्याचे निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला
निट पेपर फुटी प्रकरणी २२ विद्यार्थ्यांना जीवास मुकावे लागले त्यामुळे संतप्त विद्यार्थी शिस्तप्रिय, शांततापुर्ण, लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असताना शासनाने अमानूष लाठीहल्ला, अश्रू धुराचा वापर केला विद्यार्थीनीवर न शोभणारी व काळीमा फासणारी कृत्य करणाऱ्या पोलिसांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे त्याचा निषेध करण्यासाठी कांग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी,आझाद समाज पार्टी, व आष्टी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कडकडीत बंद यशस्वी केला व्यापारी प्रतिष्ठान,शाळा, महाविद्यालये सर्व बंद ठेवण्यात आले
आष्टी येथील बंद करण्याकरीता वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते दिलीप बारसागडे, वंचित बहुजन आघाडी चे छोटू दुर्गे, हरिदास मेश्राम, राहुल फुलझले,जमनादास फूलझले,कांग्रेस पक्षाचे शंकर आक्रेडीवार शंकर मारशेट्टीवार, आझाद समाज पार्टी चे विक्की खोब्रागडे,अमीत नगराळे,सुरज देवगडे, नाशीकांत भसारकर, सामाजिक कार्यकर्ते सुजाता देव्हारे देवा वनकर रेखचंद उंदिरवाडे,निकीती निमसरकार,माधुरी झोडे, नम्रता नगराळे,ज्योती धुरके,ग्रिष्मी गोंगले सौरभ निमसरकार,योगीता खोब्रागडे,मनिषा निमसरकार,सुगत कुकुडकर, बहुजन समाज पार्टी चे विनोद दुर्गे, धनराज बावणे,अनिल गोंगले, सामाजिक कार्यकर्ते देवा बोरकुटे, संदिप तिवाडे,
आदी मान्यवर उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मार्गदर्शन करतांना दिलीप बारसागडे यांनी जंतर- मंतर वरील विद्यार्थ्यांना जे अमानूष मारहाण करण्यात आली तरीही शासन या बाबींकडे दुर्लक्ष करून भारत देशाचे आम्हीच सर्वेसर्वा आहोत या पद्धतीने वागत आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्या ऐकून न घेता त्यांना तुच्छ समजून नाहक अत्याचार केलाला आहे, विद्यार्थ्यांनी जी मागणी केली आहे ती जर पूर्ण केली तर हे आंदोलन थांबले असते परंतू प्रधानमंत्री आपल्या मंत्र्यांना प्रयत्न करीत आहेत हेच दिसून येत आहे असे प्रतिपादन केले
आष्टी येथील कडकडीत बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी यश प्राप्त केले आहे यावेळी परिसरातील विद्यार्थी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

