खासदार डॉ. नामदेव कीरसान यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; गडचिरोलीत अखेर केंद्रीय विद्यालय सुरू

0
खासदार डॉ. नामदेव कीरसान यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; गडचिरोलीत अखेर केंद्रीय विद्यालय सुरू



गडचिरोली : आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गडचिरोली येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून गडचिरोली येथे केंद्रीय विद्यालय सुरू होणार आहे.

विशेष म्हणजे, केंद्र सरकारने 2019 मध्येच गडचिरोलीतील केंद्रीय विद्यालयाला मंजुरी दिली होती. मात्र, तब्बल सहा वर्षे उलटूनही विद्यालय प्रत्यक्षात सुरू होऊ शकले नव्हते. याबाबत खासदार डॉ. कीरसान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत लवकरात लवकर विद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर गडचिरोली येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !