बिनापरवाना १,५९९ लिटर डिझेलची वाहतूक करताना निरीक्षण अधिकारी माधुरी इंगोले यांनी ट्रॅक्टरसह ७.५८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

0
बिनापरवाना १,५९९ लिटर डिझेलची वाहतूक करताना निरीक्षण अधिकारी माधुरी इंगोले यांनी ट्रॅक्टरसह ७.५८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त


आष्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल 

मुलचेरा तालुक्यात डिझेलच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई




आष्टी (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात डिझेलची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर निरिक्षण अधिकारी माधुरी इंगोले यांनी गांधीनगर येथे मोठ्या शिताफीने पकडले व लागलीच आष्टी पोलिसांना माहिती दिली त्यावरून आष्टी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत १,५९९ लिटर डिझेलसह सुमारे ७ लाख ५८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून अपराध क्र १५३/२०२६ कलम ३,७ जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी दुपारी ३.४५ ते ४.४५ वाजताच्या सुमारास मौजा गांधीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी किशोर विश्वजीत बिश्वास (वय ३०, रा. देवनगर, पो. खुदीरामपल्ली, ता. मुलचेरा) हा बिनानंबर प्लेटच्या जॉन डिअर कंपनीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून बिनापरवाना मोठ्या प्रमाणात डिझेलची वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन लोखंडी ड्रममध्ये साठविलेले ४०० लिटर डिझेल आणि पाच प्लास्टिक बॅरलमध्ये साठविलेले १,१९९ लिटर डिझेल असा एकूण १,५९९ लिटर डिझेल जप्त केला. यासोबतच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर-ट्रॉली आणि संबंधित डिझेल खरेदीची बिलेही जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख ५८ हजार ७८० रुपयांचे डिझेल व अंदाजे ६ लाख रुपये किमतीचा जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर-ट्रॉली यांचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत ७ लाख ५८ हजार ७८० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी तहसील कार्यालय मुलचेरा येथील निरीक्षण अधिकारी श्रीमती माधुरी सुधाकरराव इंगोले यांच्या लेखी तक्रारीवरून आष्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईनंतर आरोपीला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अवैध इंधन साठवणूक व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने त्यांचे परिसरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !