अवैध देशी दारू तस्करांना आष्टी पोलीसांनी केले जेरबंद

0
अवैध देशी दारू तस्करांना आष्टी पोलीसांनी केले जेरबंद 

सात लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 
दोन आरोपींना केली अटक 


आष्टी (अशोक खंडारे/ संपादक वैनगंगा वार्ता १९) ७९७२४३४९२५
अवैध देशी दारू तस्करांना आष्टी पोलिस जेरबंद केल्याची घटना दि ३१ जानेवारी ला रात्रोचे सुमारास घडली 
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील गावात देशी दारूचा पुरवठा होत असल्याने जैरामपूर कडे एका वाहनातून अवैध देशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती वरुन कढोली ते जैरामपूर जंगल परिसरात एम एच ३३ जी १०३१ या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात बॉडी चेचीस मध्ये अंडर ग्राउंड बाक्स बनविण्यात आले आहे त्यामध्ये पाहीले असता देशी दारूचे २००० निपा आढळून आल्याने पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले सदर देशी दारू किंमत १ लाख साठ हजार रुपये व वाहन किंमत सहा लाख रुपये असा एकूण सात लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व दोन आरोपी १) मुक्तार मुस्ताक शेख वय ३१ रा. बल्लारपूर २ ) गितेश मनोज कोठारकर वय २६ रा. बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोहवा जितेंद्र मुनघाटे यांनी गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा शंकर शिडाम करीत आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !