प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा (कं) येथे हत्तीरोग औषधोपचार मोहीमेचा शुभारंभ
आष्टी. (अशोक खंडारे):-
दिनांक 10/02/2026 ला प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा (कं) येथे हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम IDA मोहिमेचे शुभारंभ करण्यात आला
यावेळी सरपंच सौ. वनश्रीताई चापले ग्राम पंचायत मार्कंडा (कं), श्री. ग्रामपंचायत सदस्य विजयभाऊ बहिरेवार यांचे समक्ष गोळ्या खाऊ घालण्यात आल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्कंडा,अनखोडा ,ठाकरी, चपराळा,उमरी, चौडमपल्ली या उपकेंद्रात १६ गावे समाविष्ट असून ही मोहीम सर्व गावात राबविण्यात येणार आहे त्याकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ राजकुमार कुकुडकर, वैद्यकीय अधिकारी
डॉ.मोहिनी रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. युगश्री डोर्लीकर व आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका जातीने लक्ष घालून राहणार आहेत व ते उपस्थित होते ही मोहीम जोमाने राबविण्यात येणार आहे सदर मोहीम १० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत या कालावधीत आहे प्रत्येक व्यक्तीला वाटप करण्यात येणाऱ्या गोळ्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते त्यामुळे आपल्या आरोग्य केंद्रातील सर्व नागरिकांना आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे

