प्रशांत धाम चपराळा येथे धर्मार्थ दवाखाना व कार्यालयाचे उद्घाटन
दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
आष्टी:- (अशोक खंडारे)
चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान प्रशांत धाम चपराळा येथे धर्मार्थ दवाखाना व कार्यालयाचे उद्घाटन तसेच दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला
उद्घाटन माजी खा. डॉ. नेते यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथी माजी आमदार डॉ. उसेंडी, बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, तहसिलदार घोरुडे, आशिषजी पिपरे,ट्रस्ट चे अध्यक्ष संजय पंदिलवार आदि मान्यवर उपस्थित होते.
धर्मार्थ दवाखाना सुरू करण्यासाठी प. पु. कार्तीकस्वामी महाराज यांच्या सेवेत १९९२ पासून लिन झालेले डॉ. सचिन मनोहरराव महिन्द्रकर , डॉ. वंदना सचिन महिन्द्रकर यांनी स्वामींच्या आदेशानुसार २००७ पासून प्रत्येक महिन्याला एक दिवस रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा व औषध उपचार करीत आहेत
त्यांनी स्वतः व प्रितम मनोहरराव महिन्द्रकर, मनोहरराव बाळापुरे, कविता अग्रवाल, नरेश जैन, प्रकाश कौसटकर, सुरेश गर्ग, निलेश सयामी, नामदेव रामटेके यांच्या सहकार्याने दवाखाना व कार्यालयाचे नुतनीकरण केले व भक्तांना करिता दवाखाना उपस्थित करुन दिला आहे तसेच दिनदर्शिकेचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धाम चपराळा चे अध्यक्ष संजय पंदिलवार, रामचंद्र बामनकर, कवडू कुंदावार, प्रकाश गौड, दिवाकर कुंदोजवार, विनोद भोयर, सुधाकर बतुलवार यांच्या परिश्रम घेतले कार्यक्रमास आंध्रप्रदेश व महाराष्ट्र येथील भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते

