स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय आलापल्ली येथे बालिका दिन उत्साहात साजरा

0
स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय आलापल्ली येथे बालिका दिन उत्साहात साजरा



आलापल्ली :- (अशोक खंडारे)
येथील स्व. लक्ष्मीबाई कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. 
यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दिपक दादा आत्राम  साहेब यांनी आपल्या उद्घाटक भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातिल अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला असून त्यावेळी त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजात असलेल्या अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करून त्या बंद करण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष केला हे सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयातिल विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांना स्मरण करणारे नृत्याचे सादरीकरण केले तसेच B. SC  प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भूमिका यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती दिली, याप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा. विशाखा पारखी मॅडम  यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित गित सादर करुन सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली. तसेच प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्रा. प्रदिप लोहकरे सर यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे स्मरण करून विद्यमान युगात माणसातील भुत ओळखून आपले ज्ञान अद्ययावत करत राहण्याचे संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिले यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. नितेश बोरकर सर, प्रा.यामिनी बोदलकर मॅडम, प्रा. विशाखा पारखी  मॅडम, प्रा. लावण्या चेडे मॅडम, प्रा. अजय बारसागडे सर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय बारसागडे सर यांनी केले तर रा. से.यो.  विभाग प्रमुख प्राध्यापिका यामिनी बोदलकर मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून कार्यक्रम आयोजित करण्याचे उद्देश स्पष्ट केले. कार्यक्रमाचे   आभार प्रदर्शन प्रा. नेहा रूकमोडे मॅडम यांनी केले. 
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रा.राजेश गर्गम सर, प्रा. अमित कोहपरे सर, प्रा. कैलाश चापले सर, प्रा. अक्षय पाल सर, प्रा. डॉ. अविनाश रामटेके सर, व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !