आज आमच्या माता - भगिणी शिक्षिका, इंजिनियर, वैज्ञानिक, राष्ट्रपती आहेत ते सावित्रीमाई चे उपकार - मुख्याध्यापक अविनाश भड.
आष्टी (अशोक खंडारे):-
आज आमच्या माता -भगिणी शिक्षीका, इंजिनिअर, वैज्ञानिक, राष्ट्रपती आहेत ते सावित्रीमाई ते उपकार आहेत असे प्रतिपादन मुख्याध्यापक अविनाश भड यांनी केले
दिनांक ३ जानेवारी ला वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित रविंद्रनाथ टागोर हिंदी हायस्कूल, रविंद्रपुर या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंती ( तिथीनुसार) संयुक्त रित्या साजरी करण्यात आली. या निमित्याने अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री. अविनाश भड सर प्रमुख अतिथी म्हणून श्री. सरकार सर, श्री. हलदार सर, सौ. निमसरकार मॅडम आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला महोदयांनी सावित्रीमाई आणि आऊसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व महोदयांनी सावित्रीमाई आणि आऊसाहेब जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मानसी मंडल व आभार प्रदर्शन श्री. सरकार सर यांनी करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

