स्व. लक्ष्मीबाई महाविद्यालयात RED REEBON CLUB च्या नवीन समितीचे उद्घाटन

0
स्व. लक्ष्मीबाई महाविद्यालयात RED REEBON CLUB च्या नवीन समितीचे उद्घाटन 🎀



 आलापल्ली : स्थानिक स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात Red Ribbon Club (RRC) समितीची नुकतीच उत्साहपूर्ण स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढवण्यावर तसेच आरोग्य व एचआयव्ही/एड्स संबंधी जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कार्य. प्राचार्य प्रा.डॉ. नितेश बोरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना ‘आरोग्यदूत’ बनून समाजात पसरलेले एड्सविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या सौ. रश्मी मार्गमवार मॅडम आय. सी. टी. सी. समुपदेशक, तालुका रुग्णालय आरोग्य विभाग, अहेरी यांनी RRC च्या कार्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना वर्षभर सक्रिय राहून विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री सरोश बोरकर, प्रा. अमित कोहपरे, प्रा. कु. विशाखा पारखी मंचावर उपस्थित होत्या.रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. यामिनी बोधलकर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम यशस्वी झाला. सह कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रेमानंद खाडे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी माजी रासेयो अधिकारी प्रा. अजय बारसागडे, प्रा. कैलास चापले व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !