आष्टी येथे होणाऱ्या आदिवासी साहित्य संमेलनाच्या लोगोचे जिल्हाधिकारी पंडा यांनी केले विमोचन
आष्टी :- महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई प्रायोजित वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे दिनांक २३ डिसेंबर मंगळवार व २४ डिसेंबर बुधवारला पहिले गडचिरोली जिल्हा आदिवासी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. आदिवासी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे विमोचन माननीय जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या शुभहस्ते, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव मा. बबलूभैय्याजी हकीम, निमंत्रक तथा प्राचार्य डॉ.संजय फुलझेले ,मुख्य संयोजक डॉ. राजकुमार मुसणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर लोगो किशोर उरकुंडवार यांनी तयार केला आहे. दोन दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्राची प्रदर्शनी, पुस्तक प्रकाशन परिसंवाद, कवी संमेलन होणार आहे. तरी साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संयोजक राजकुमार मुसणे 9423639532 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

