दुबई एशियन पॅरा गेम्समध्ये दिव्यांग श्वेता कोवेचा ऐतिहासिक पराक्रम
आष्टी:-
दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये
वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी कु. श्वेता भास्कर कोवे हिने अतुलनीय कामगिरी करत वैयक्तिक स्पर्धेत गोल्ड मेडल तसेच सांघिक गटात ब्रॉन्झ मेडल पटकावून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कढोली गावापासून ते दुबई पर्यंतचा खडतर प्रवास करीत दिव्यांगत्वावर मात करून तिने हे यश संपादन केले .भारतासाठी मेडल पटकावलेल्या या खेळाडूच्या
उल्लेखनीय यशाबद्दल वन वैभव शिक्षण मंडळाचे माननीय सचिव आदरणीय अब्दुल जमीर हकीम उर्फ बबलू भैय्याजी, तसेच दृष्टी फाउंडेशन अहेरी यांच्या अध्यक्षा सौ. शाहीन हकीम (भाभीजी) यांनी श्वेताचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्वेताच्या यशामध्ये तिचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान असलेल्या
महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख तसेच श्वेता कोवे यांचे मुख्य प्रशिक्षक डॉ. श्याम कोरडे यांचे विशेष मार्गदर्शन मोलाचे ठरले.
या यशाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, तसेच
महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे, आष्टी प्राचार्य किशोर पाचभाई, पर्यवेक्षक डी बी घाटबांधे
सुशील अवसरमोल सर्व कला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, हायस्कूलचे शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्वेताचे अभिनंदन करत, तिच्या चिकाटी, मेहनत आणि शिस्तीचे कौतुक केले.

