गॅस सिलेंंडर तुटवडयाबाबत काँग्रेस आक्रमक:, एजन्सीवर कारवाई करा
कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी यांचे वेधले लक्ष
गडचिरोली:-
गेल्या काही दिवसापासून गडचिरोली शहरात एचपी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासूनच ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. यामुळे ग्राहकांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. सिलेंडरचा तुटवडा निर्माण करून सिलेंडरचा काळाबाजार केला जात आहे. ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या एचपी गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, मागील 15 दिवसापासून गडचिरोली शहरात एचपी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरसाठी त्रासाचा सामना करावा लागत आहे. सिलेडरसाठी थंडीच्या दिवसात पहाटे 3 वाजतापासूनच एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. जेष्ठ नागरिक सुध्दा रिक्षा भाडयाने करून सिलेंडरसाठी गॅस एजन्सीसमोर रांगेत लागत आहेत.
सिलेंडरसाठी आनॅलाईन बुकींग करावी लागते. त्यानंतर ग्राहकांना घरपोच सिलेंडर पुरवठा करणे नियमानुसार आवश्यक आहे. परंतू पंधरा दिवसा सिलेंडरचा थांगपत्ता नसतो. तसेच ग्राहकांना एजन्सीकडून योग्य ती माहिती दिल्या जात नाही.
अधिक माहिती घेतली असता हिंदुस्थान पेटोलियम च्या प्लॉंन्ट मध्ये मुबलक गॅस उपलब्ध होत नसल्याने गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हयात दहा पेक्षा अधिक एचपी गॅसचे वितरक असून प्रत्येक वितरकांकडे 300 पेक्षा अधिक ग्राहक वेटींगवर आहेत. बुकींग केल्यानंतर पावती निघूनही सिलेंडरसाठी ग्राहकांना एजन्सी समोर रांगेत लागावे लागते. रांगेत तीन ते चार तास ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देउुन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
एजन्सीकडून सिलेंडरचा काळाबाजार
सिलेंडरचा तुटवडा दाखवून सिलेंडरचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप कुणाल पेंदोरकर यांनी केला आहे. एजन्सीच्या गाडया शहरात फिरत असून ‘ब्लॅक’ मध्ये दीड ते दोन हजारात सिलेंडरची विक्री केली जात आहे. मात्र बुकींग केलेल्या ग्राहकांना सिलेंडरचा तुटवडा असल्याचे सांगून नाहक ़त्रास दिला जात आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा नेमक्या कशामुळे झाला याची चौकशी करावी आणि हा प्रकार थांबवून सिलेंडरचा तुटवडा दूर करून एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी कुणाल पेंदोरकर यानी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे
व्यावसायिकांना मुबल सिलेंडर, तर ग्राहकांसाठी तुटवडा
गडचिरोली शहरात घरगुती सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असतांना मात्र व्यावसायिकांना मुबलक सिलेंडरच मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक व्यावसायिक आपल्या दुकानात घरगुती सिलेंडरचा वापर करतांना दिसून येत असून हे नियमाविरूध्द आहे. व्यावसायिकांसाठी वेगळे सिलेंडर आहेत. खानावळ, हॉटेल अन्य कठकाणी नियमाचे उल्लंघन घरगुती सिलेंडरचा सर्रास वापरत होत आहे. याकडे पुरवठा विभागाने ल़क्ष देण्याची गरज आहे.

