सुवर्णकन्या श्वेता कोवे हिचा मिरवणूक काढून आष्टी नगरात केला भव्यदिव्य सत्कार
आष्टी - (अशोक खंडारे):-
दुबई येथे झालेल्या आशियाई युवा पॅरा गेम्स २०२५ स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात श्वेता भास्कर कोवे हिने सुवर्णपदक प्राप्त करुन देशाची मान उंचावली आहे.तिच्या या कामगिरीमुळे आज बँडबाजाच्या गजरात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयापासून मिरवणूक काढून आष्टीवासियांतर्फे भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. दुबई येथून नागपूर येथे पोहचल्यानंतर श्वेता कोवे हिचा शिक्षण संचालक , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू , तसेच अनेक खेळाडूंनी तिचा सत्कार केला. या सत्काराने ती भारावून गेली.
आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयापासून श्वेता कोवे हिला खुल्या गाडीमध्ये बसवून बँडबाजाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.ही मिरवणूक आंबेडकर चौकापासून तर शिवाजी चौकात नेवून गावातून फिरविण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी , युवक , खेळाडू व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे,
वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव बबलू भैय्या हकीम , दृष्टी फाउंडेशन अहेरी च्या अध्यक्षा शाहीन भाभी हकीम , प्राचार्य संजय फुलझेले व सर्व प्राध्यापक , शिक्षक सहभागी झाले.
आंबेडकर चौकात आष्टीच्या सरपंच बेबी बुरांडे ,, मंगेश पोरटे, ग्राम पंचायत सदस्य कपिल पाल , ग्राम पंचायत सदस्य संतोष बारापात्रे , छोटू दुर्गे , आनंद कांबळे , प्राचार्य संजय फुलझेले , प्राचार्य किशोर पाचभाई , पर्यवेक्षक डी बी घाटबांधे , तिचे प्रशिक्षक प्रा. डॉ श्याम कोरडे , प्रा.भारत पांडे , प्रा. रवी शास्त्रकार , प्रा. गणेश खुणे , प्रा. डॉ. राज मुसणे , प्रा. रवी गजभिये. , प्रा. ज्योती बोभाटे आदी उपस्थित होते

