आष्टी येथे रंगणार जिल्हास्तरीय आदिवासी साहित्य संमेलन
आष्टी (गडचिरोली) अशोक खंडारे : - मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे २३ व २४ डिसेंबर रोजी पहिले गडचिरोली जिल्हा आदिवासी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या तयारीला सध्या जोर आला आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विचारवंत व आदिवासी साहित्याचे
प्रवर्तक प्रा. डॉ. विनायक तुमराम यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या संमेलनास आ. डॉ. मिलिंद नरोटे, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ. रामदास मसराम, माजी मंत्री अंब्रीशराव आत्राम, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्राचार्य बनपूरकर, प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, साहित्यिक सुनील कुमरे, ज्येष्ठ साहित्यिक कुसुम अलाम आदी मान्यवर उपस्थित राहतील.

