स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय आलापल्ली येथे जागतिक एच. आय. व्ही. एड्स दिन सम्पन्न
आलापल्ली: येथील स्व. लक्ष्मीबाई कला , विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात जागतिक एच.आय. व्ही. एड्स दिनाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजात एच. आय. व्ही. एड्सचे विषाणू बद्दल जनजागृती निर्माण करणे व संभाव्य धोक्यापासून बचाव करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात जनजागृती रॅली ने करण्यात आली . ज्यामध्ये विद्यार्थीनी एड्सबाबत जनतेला जागरूक केले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यीनी एड्सच्या प्रतिबंधाबद्दल सुरक्षितता, उपाय आणि लवकर ओळख करून घेतल्यास कसे उपचार होऊ शकतात याबद्दल माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. नितेश बोरकर तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका बोदलकर , सह कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक खाडे आणि महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबीन क्लब विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यीनिनी विशेष सहकार्य केले.

