अनखोडा येथे न्यु केअर बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
आष्टी (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे न्यु केअर बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तर्फे मोफत आरोग्य शिबीर दि.१९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले
सदर शिबिराचे उद्घाटन कार्यकारी संचालक लॉयड्स मेटल ॲंड एनर्जी लि. एस.व्येकटेश्वरन यांचे हस्ते करण्यात आले यावेळी नेत्रतज्ञ डॉ. उज्वला वेलादी, अस्तीरोग तज्ञ डॉ. अखील लोहकरे, कर्करोग तज्ञ सौरभ मेश्राम, हृदयरोग तज्ञ डॉ.योगेश शिडाम, दंतरोग तज्ञ डॉ. उत्कर्षा माहोरकर, जनरल फिजिशीयन डॉ. तोहीत अनंतुलवार ,डी.एम.बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात अनखोडा,कढोली,उमरी,चंदनखेडी (खर्डी) , रामपूर गावांमधील ३८४ रुग्णांनाची तपासणी करून उपचार करण्यात आले
न्यु केअर बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या तर्फे आयोजित शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा दिलीप बारसागडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले रोगनिदान शिबिराकरीता आरोग्याची तपासणी करण्यासाठी आलेल्या चंद्रपूर येथील डॉक्टरांच्या चमुचे व उपस्थित शिबिरार्थी रुग्णांचे डी एम बारसागडे यांनी आभार व्यक्त केले


