ग्रामपंचायत लगाम येथे संविधान दिवस मोठ्या हर्षोल्लासात साजरा
लगाम (अशोक खंडारे) वैनगंगा वार्ता १९ :-
ग्रामपंचायत लगाम येथे संविधान दिवस मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान स्वीकारण्यात आले होते, जे काही दिवसांनंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतात लागू झाले. संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो.भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा एक लिखित दस्तऐवज आहे, जो सरकारची रचना, कार्यपद्धती, अधिकार आणि कर्तव्ये तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये निश्चित करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत हेही सर्वस्कृत आहे
आणि हे जगातील सर्वात मोठे स्वलिखित राष्ट्रीय संविधान आहे. संविधानाचे महत्त्व हे आहे की ते देशासाठी सर्वोच्च कायदा म्हणून कार्य करते, सरकारसाठी एक चौकट प्रदान करते आणि नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांचे संरक्षण करते. ते कायद्याचे राज्य सुनिश्चित करते, सामाजिक सुव्यवस्था राखते आणि देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांसाठी मूलभूत तत्त्वे आणि दिशा निश्चित करते. संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत लगाम कार्यालयात संविधान दिवस श्री. दिपक उद्धव मडावी सरपंच ग्रा. प लगाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. कार्यक्रमात संविधान उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात येऊन संविधान उद्देशीका प्रत जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम, को-ऑपरेटिव्ह बँक, अंगणवाडी केंद्र यांना देण्यात आले. व जिल्हा परिषद शाळा लगाम तर्फे संविधान दिवस प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमासाठी श्री. डॉ.सुरपाम सर (वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र लगाम )श्री. शैलेश मडावी शाखा व्यवस्थापक को ऑपरेटिव्ह बँक लगाम, श्रीमती सिडाम म्यॅडम(अंगणवाडी पर्यवेक्षिका) श्री मधुकर गेडाम, उपसरपंच, श्री. राजूभाऊ पंबलवार, श्री देवाजी सिडाम, उमा आत्राम, सुरेखा सोयाम, संगीता मोहुर्ले, पूजा गोविंदवार, शैलू मडावी, सुरेखा मडावी (मोबिलायजर )आत्राम सिस्टर,अरुण हलदार, सुरज मडावी, आयुष मडावी, बेबीताई त्रीनगरिवार, मंगला मडावी, देवराव सडमेक व राकेश दुर्गे यांची उपस्थिती होती.

