स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय आलापल्ली येथे संविधान दिन उत्साहात साजरा
आलापल्ली : येथील स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठं उत्साहात साजरा करण्यात आला संविधान दिनाच्या अनुषंगाने संविधानाचे प्रास्ताविक (Preamble) सामूहिक वाचनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनी व शिक्षकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे व लोकशाही मूल्यांची जाणीव दृढ करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. त्यानंतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन संविधानाचा प्रास्ताविक गंभीरपणे वाचला.
यावेळी महाविद्यालयाचे कार्य. प्राचार्य डॉ.बोरकर सर यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले की, “भारतीय संविधान हे आपल्या हक्कांचे संरक्षण करणारे व कर्तव्यांची जाणीव करून देणारे एक पवित्र दस्तऐवज असून, प्रत्येक नागरिकाने त्याचे पालन करणे आवश्यक आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बारसागडे सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनींनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

