वन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा गडचिरोली वनवृत्ताकडून निषेध

0

वन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा गडचिरोली वनवृत्ताकडून निषेध




आष्टी :- मानव व वन्यजीव संघर्षामुळे वन कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, गडचिरोली वनवृत वन्यजीव चपराळा अभयारण्य तर्फे दि.६ नोव्हेंबर2025 रोजी जाहीर निषेध करण्यात आला. चपराळा वन्यजीव व वनविभागातील वनरक्षक, वनपाल, वनमजूर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, चौडमपल्ली वन्यजीव समोर तसेच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मानव व वन्यजीव संघर्षामुळे वन कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा काळ्या फिती लावून जाहीर निषेध व्यक्त केला. फॉरेस्टर्स आणि फॉरेस्ट गॉर्डस असोशिएशन, ठाणा सलग्न महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, नागपूर यांचे जाहीर आवाहनानुसार राज्यभर मानव व वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून जीवित हानी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. घडलेल्या घटनां संबंधात वन कर्मचाऱ्यांच्या संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत. मात्र अशा दुर्दैव घटनेत क्षेत्रीय कर्मचारी यांना दोषी ठरवून क्षेत्रीय कर्मचारी, शासकीय कार्यालये, शासकीय तसेच कर्मचाऱ्यांची खाजगी वाहने यांच्यावर वारंवार होत असलेले हल्ले ही चिंतेची बाब आहे. राज्यात वन्य प्राण्यांची वाढती संख्या पाहता भविष्यात मानव वन्यजीव संघर्षाची प्रकरणे हाताळताना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान असून सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्षेत्रीय कर्मचारी अशा घटनांमुळे धस्तावलेला असून त्याच्या मनात असुरक्षितेची भावना घर करत आहे. संघटना वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता व मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनावर आळा बसण्याकरिता शासनाने योग्य उपयोजना कराव्या यासाठी संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीने
केलेल्या आवाहनानुसार चौडमपल्ली वन्यजीव व प्रादेशिक वनक्षेत्र कार्यालयासमोर काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेध वनरक्षक वनपाल संघटना नागपूर, शाखा -गडचिरोली वन्यजीव व चपराळा अभयारण्य त्तर्फे नोंदवून निवेदनाद्वारे शासनास भावना व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष रुषी मडावी, वृत्तीय अध्यक्ष नितेश कुमरे, वनपाल चंद्रकांत सडमेक, वनपाल धनंजय कुमरे, वनरक्षक राजू सांगडे, प्रफुल्ल मडावी विश्वनाथ मंथनवार यांचेसह बहुसंख्य वनकर्मचारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !