गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे आष्टी येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांचा खो
मुख्यालयी न राहता व कामात दिरंगाई करतांना वेतन मात्र बरोबर
आष्टी:-
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा मार्गदर्शनाखाली यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विद्युत पुरवठा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरीकांना उत्कृष्ट सेवा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र या आदेशाकडे आष्टी येथील महावितरणच्या अभियंत्यांनी कानाडोळा केला आहे. ते मुख्यालयी राहत तर नहीत व नागरीकांच्या सोडविण्याकडेही दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची अतिदुर्गम भागात बदली करण्याची मागणी होत आहे.
विद्युत पुरवठा हा ग्रामीण आणि
शहरी भागाच्या विकासाचा कणा आहे. मात्र विद्युत वितरण विभागाच्या कामकाजावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी विशेष बैठक
आयोजित केली होती. प्रत्येक ब्रेक डाऊनचे विश्लेषण करून तांत्रिक उपयोजना ठरविण्याचे तसेच उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
मात्र आष्टी येथील महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता आष्टीला राहत नसल्याची ओरड आहे. नावापूरती किरायाची रूम केली आहे. दिवसभर आष्टी येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. या संदर्भात अभियंता राऊत यांना विचारणा केली असता प्रतिसाद देत नसल्याची ओरड आष्टीवासीयातून सुरू आहे. आष्टी येथील अभियंता यांची तात्काळ बदली करून या ठिकाणी नवीन अभियंता देण्याची मागणी आष्टीवासीय वारंवार तक्रारीतून निवेदनातून करीत आहेत. मात्र महावितरण विभागातील वरीष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
याबाबीची जिल्हाधिकारी पंडा यांनी दखल घेऊन आष्टी येथील अभियंत्याची लवकरात लवकर अतिदुर्गम भागात बदली करावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

