ग्रामपंचायत लगाम येथे मूकनायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंत्ती उत्साहात साजरी.
लगाम:-
पंचायत समिती मुलचेरा जि. गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत लगाम येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंत्ती साजरी करण्यात आली
या वेळी लगाम ग्रामपंचायतचे सरपंच श्री. दिपक उद्धव मडावी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून थोडक्यात त्यांचा जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला व यानंतर या दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण झालेल्या घरकुलाचे गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यात आले. व ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच, श्री मधुकर गेडाम, राजूभाऊ पंबलवार, पोलीस पाटील श्री. गिरमाजी मडावी, सुरेखा मडावी, संदिप गेडाम, अरुण हलदार, सुरज मडावी, आयुष मडावी व ग्रामपंचायत अधिकारी श्री राकेश दुर्गे आदि उपस्थित होते.

