आष्टी येथील समस्यांकडे ग्रामसेवक व सरपंचाचे अतिशय दुर्लक्ष, गटविकास अधिकारी यांच्या आदेशास केराची टोपली
आष्टी:- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी गावातील समस्या सोडविण्याकडे अतिशय दुर्लक्ष केले आहे शिवाय गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशही धुडकावून लावत केराची टोपली दाखवली आहे असेच चित्र सध्या दिसत आहे
आझाद समाज पक्षाचे युवा आघाडी जिल्हा अध्याक्ष विवेक खोब्रागडे यांचाकडून वारंवार निवेदन देऊनही गावातील मूलभूत समस्यांवर अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामसेवक व सरपंच यांनी या निवेदनांकडे अतिशय दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आझाद समाज पार्टी कडून होत आहे.
गावातील पाणीपुरवठा , स्वच्छता, शाळेच्या आवारा सभोवती साचलेला घन कचरा, शिक्षक व विद्यार्थांना होणारा त्रास तसेच सार्वजनिक मुत्रीघर अशा अनेक तातडीच्या समस्यांकडे ग्रामपंचायतीकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यासंदर्भात तालुका कार्यालयाकडे देखील तक्रार व निवेदन करण्यात आले. यावरून गटविकास अधिकारी (BDO) यांनी ग्रामसेवक व सरपंचांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. मात्र, संबंधित ग्रामसेवकाने या आदेशाकडेही काना-डोळा केला आहे व त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम न करता केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संताप वाढला आहे.
आझाद समाज पार्टीचे युवा आघाडी जिल्हा अध्याक्ष विवेक खोब्रागडे यांनी चेतावणी दिली आहे की, लवकरात लवकर गावातील प्रश्न सोडवले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.

