मनसे शहर संघटीका विद्या हीवरकर यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

0
 मनसे शहर संघटीका विद्या हीवरकर यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.




वणी :.- कनकवाडी येथे वास्तव्यास असलेल्या महिला उद्योजक तथा मनसेच्या शहर संघटिका विद्या सुधाकर हिवरकर वय ४५ वर्षे यांनी त्याचे राहत्या घरात बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी १२ वाजताचे दरम्यान घरात एकटी असताना बेडरूमच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र ही हृदयद्रावक घटना सायंकाळी 6 वाजता उघडकीस आली.

माहितीनुसार विद्या यांचे घराचे मागे राहणारी तिची मैत्रीण तिला दुपारी पासून फोन करीत होती. मात्र तिनं कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून सायंकाळी ती पाहण्यासाठी तिच्या घरात गेली. त्यावेळी सर्व दार आतून बंद असल्याने तिनं बेडरूमच्या मागील खिडकीतून डोकावून पाहिले असता ती पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. मैत्रिणीने आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले. त्यानंतर पोलिसांना सूचित करण्यात आले.

हिवरकर या घरुनच लेडीज गारमेंटचा व्यवसाय करीत होत्या. समाजात सक्रिय सहभाग आणि धडाडीच्या नेतृत्वामुळे त्यांची स्वतंत्र ओळख होती. सोबतच त्या एका क्षेत्रीय राजकीय पक्षाच्या पदाधिकारी म्हणून काम करीत होत्या. मृतक विद्या यांची मुलगी प्रणाली फैशन डिझायनर असून नोएडा इथे नोकरीवर आहे. तर त्यांचा मुलगा मोहित याचा आज नोकरीसाठी इंटरव्ह्यू होता. विद्या यांचे पती सुधाकर हिवरकर हे खाजगी काम करतात. विद्या हिवरकर यांनी असा टोकाचा पाऊल का उचलला ? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालं नाही.

मृत विद्या हिवरकर यांच्या पश्चात पती सुधाकर हिवरकर, मुलगी प्रणाली, मुलगा मोहित तसेच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !