गडचिरोली जिल्ह्यातील सागवान तस्करीचे सुत तेलंगाणाशी

0
गडचिरोली जिल्ह्यातील सागवान तस्करीचे सुत तेलंगाणाशी 


गडचिरोली:-
सागवानाची अवैधरित्या तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी सापळा रचून एका चारचाकी वाहनासह 10 सावागन लठ्ठे जप्त करुन सागवान तस्करीचा पर्दाफाश केल्याची कारवाई गुरुवारी (दि 4) पहाटेच्या सुमारास कोपेला-सोमनपल्ली जंगलात केली विशेष म्हणजे, सदर तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन तेलंगाणा राज्यातील आहे यावरुन सिरोंचातील सागवान तेलंगाणा राज्यात तस्करी होत असल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कोपेला-सोमनपल्लीच्या जंगलातून सागवान तस्करी होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली या माहितीवरुन वनपथकाने आज पहाटेच्या सुमारास सदर परिसरात सापळा रचला दरम्यान, टीएस 12 युबी 3262 क्रमांकाचे चारचाकी वाहन सागवान लठ्ठ भरुन येताना दिसताच वनपथकाने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला वनकर्मचा-यांच्या सतर्कतेने वाहन ताब्यात घेण्यात आले तपासणी केली असता, 10 सागवान लठ्ठे आढळून आले वनविभागाने चारचाकी वाहन व सागवान असा एकूण 6.28 लाखाचा मुद्देमाल जप्त केला चौकशीत आरोपी रमेश सत्यनारायण कैरोजू रा. आझमनगर जि. भोपालपल्ली (तेलंगाणा) याने गुन्ह्याची कबुली दिल त्याच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, उपविभागीय वनाधिकारी अक्षय मिना यांच्या मार्गदर्शनाखाली आसरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस जी सुरपाम यांच्या नेतृत्वात वन कर्मचा-यांनी पार पाडली

दोन महिन्यात दोनदा तस्करी-

अवैध सागवान तस्करीची ही पहिलीच घटना नसून मागील महिन्यात सुद्धा बोलेरो वाहनातून सागवान तस्करी करताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले होते त्यावेळेस 5.3 लाखाचा मुद्देमा जप्त करण्यात आला होता सागवान तस्करीची सलग दोन प्रकरणे उजेडात आल्याने जंगलातील वृक्षतोड होत असताना वनकर्मचारी आणि अधिकारी नेमके काय करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे निव्वळ गाडीतून जाताना माल पकडल्याने तस्करी थांबणार नाही जंगलात वृक्षतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !