आष्टी पोलीस स्टेशनमध्ये अवघ्या महिन्याभरात सात बेपत्ता झालेल्या इसमांचा लावला शोध
आष्टी पोलिसांची वाखाणन्यासारखी कर्तबगारी
आष्टी- (अशोक खंडारे /संपादक वैनगंगा वार्ता १९)
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये रेकार्डवर मागील दोन वर्षापासून बेपत्ता असलेल्या सात इसमांना शोधून काढण्यासाठी आष्टी पोलिसांनी शोधमोहीम राबवून महिनाभरात ७ बेपता झाले होते त्या ईसमांना शोधून काढले आहेत.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात दोन मिसिंग पथके तयार करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध घेतला.
शेवंता कुशन डोंगरे वय ३९ वर्षे रा. मुधोली चेक नं २ ता. चामोर्शी, एकनाथ हरिशचंद्र नेवारे वय २७ वर्षे रा. शेलूर ता. चामोर्शी, युगांश संतोष राठोड वय १८ वर्षे, सविता देवाशिष चक्रवर्ती वय ३६ वर्षे, प्रभाकर पोचना आचेवार वय ५२ वर्षे तिन्ही रा. आष्टी ता. चामोर्शी पदमा रमेश कनकावार वय ३४ वर्षे राहणार चंदनखेडी (खर्डी ) ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांना शोधून काढण्यात आष्टी पोलिसांच्या शोध पथकास
यश आले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक निलोत्पल, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल काळे, पोलीस हवालदार प्रकाश सिडाम, भाऊराव वनकर, पोलीस शिपाई हर्षद जाधव, रवींद्र मेदाडे, अखिल श्रीमनवार तसेच त्यांचे सहकारी यांनी बहुमुल्य वाखाणण्याजोगी कर्तबगारी केली आहे

