पोलीस - नक्षलवादी चकमकीत चार नक्षलवाद्यांचा गडचिरोली पोलीसांनी केला खात्मा
गडचिरोली:- पोलीस व नक्षलवादी चकमकीत गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला
दिनांक 25/08/2025 रोजी गडचिरोली– (छतिसगढ) नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर नक्षलवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासाहार्य गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री. एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.
सदर भागात सुरू असलेल्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण 04 जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह (01 पुरुष आणि 03 महिला) मिळून आले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 01 .303 रायफल जप्त करण्यात आले आहेत.
त्याच परिसरात उर्वरित नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी नक्षलवाद विरोधी अभियान सुरू आहे.
असे पोलीस विभागाने कळविले आहे

