चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५):- चंद्रपुरातील जुनोना गावात २३ ऑगस्ट रोजी जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर अस्वलीने हल्ला केला होता, या हल्ल्यात वडील अरुण कुकसे व मुलगा विजय कुकसे गंभीर जखमी झाले होते. अरुण कुकसे यांना नागपुरातील एम्स मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र २५ ऑगस्ट रोजी अरुण कुकसे यांचा मृत्यू झाला.
२३ ऑगस्ट रोजी अरुण व विजय कुकसे पिता-पुत्र जुनोना जंगलात पाने तोडण्यासाठी गेले असता अरुण कुकसे वर अस्वलीने हल्ला केला, वडिलाला वाचविण्यासाठी विजय ने अस्वलीचा सामना केला मात्र अस्वलीने दोघांना पंज्यात पकडत जखमी केले, यावेळी दोघांनी आरडाओरडा केला असता गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेत, अस्वलीला हाकलण्यास सुरुवात केली मात्र अस्वलीने दोघांना सोडले नाही.
उपचारादरम्यान मृत्यू
गावकर्यांनी हातात दंडुके घेत अस्वलीला हाकलण्याचा प्रयत्न केला, तासभरानंतर अस्वलीने दोघांना सोडले, यावेळी अरुण कुकसे हे गंभीर जखमी झाले होते, गावकर्यांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, वडील अरुण हे गंभीर जखमी असल्या कारणाने त्यांना तात्काळ नागपुरातील एम्स मध्ये दाखल करण्यात आले. आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी अरुण कुकसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या मुलगा विजय रुग्णालयात उपचार घेत आहे.
अस्वलाच्या हल्ल्यांनंतर वनविभागाने कसोशीने प्रयत्न करीत अस्वलाला जेरबंद केले होते, मात्र अस्वल गंभीर जखमी असल्याने २४ ऑगस्ट रोजी अस्वलाचा मृत्यू झाला. जुनोना गावातील नागरिकांनी मागणी केली आहे कि मृतक अरुण कुकसे यांच्या परिवाराला २५ लाख रुपये आर्थिक भरपाई तर मुलगा विजय ला वनविभागात नोकरी द्यावी अशी मागणी केली केली आहे.

