देसाईगंज (वडसा) येथे कांग्रेसचे घंटानाद आंदोलन

0
देसाईगंज (वडसा) येथे कांग्रेसचे घंटानाद आंदोलन



वडसा:-
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन  उपविभागीय कार्यालय, वडसा समोर, आमदार रामदासजी मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत भव्य घंटानाद आंदोलन करण्यात आले.

आज शेतकरी असंख्य समस्यांनी त्रस्त झालेले आहेत. शेतमालाला योग्य दर न मिळणे, पीक विमा कंपन्यांकडून होणारी उघड फसवणूक, बोनस व चुकारे थकवणे तसेच कर्जमाफीची अपुरी अंमलबजावणी या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांचे निव्वळ चुकारे अद्याप देय आहेत. शासनाने जाहीर केलेल्या बोनस योजना फक्त कागदावरच राहिल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असली तरी, कंपन्यांच्या अन्यायकारक अटी, विलंबित कार्यवाही व नियमांच्या कचाट्यात शेतकऱ्यांची सतत फसवणूक होत आहे.

याशिवाय, पारंपरिक कृषी पंपांच्या ऐवजी जबरदस्तीने बसवले जाणारे सोलर पंप, त्यातून निर्माण झालेल्या अडचणी व जादा खर्च यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वाढलेला आर्थिक भार हा शेतकऱ्यांच्या खिशावर थेट परिणाम करणारा ठरत आहे.

गेल्या काही महिन्यांतील नैसर्गिक आपत्ती व अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरीदेखील शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत आहे.

या सर्व प्रश्नांवर ठोस तोडगा निघावा, शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा भाव, तात्काळ भरपाई, कर्जमाफीची संपूर्ण अंमलबजावणी व पीक विमा योजनेंतर्गत तत्काळ मदत मिळावी या मागण्यांसाठी  घंटानाद आंदोलन करण्यात आले आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, तालुक्यातील शेतकरी, मजूर, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !