७/१२ कोरा-कोरा चा नारा देवुन खापा गावात पोळयाचा सण साजरा करण्यात आला.
खापा (तुमसर):- (अशोक खंडारे)
आज पोळ्याच्या सणाचे औचीत्य साधुन खापा या गावात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे पोळ्यामंध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या हातात ७/१२ कोरा-कोरा, शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी असे फलक घेऊन सर्व शेतकरी बांधव तसेच पोळ्यात आलेल्या लाडक्या बहिने ने 7/12 कोरा-कोरा चा फलक हातात घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे असा मोलाचा संदेश दिला.
पोळा हा सण शेतकरी बांधवांकरीता एक महत्वाचा सण असतो. पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवुन शेतकरी बांधव पोळा सण साजरा करीत असतात.
शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी या करीता मा. बच्चुभाऊ कडू नेहमी प्रयत्नशील असतात, भाऊंनी दिलेल्या आदेशानुसार संपुर्ण राज्यात पोळ्याच्या दिवशी शासना पर्यंत एक संदेश पोहचावा म्हणुन प्रहार संघटने तर्फे सात बारा कोरा करा, शेतकऱ्यांची कर्ज माफी करा असा संदेश पोळ्यात आलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी दिला. आणि एक आगळा-वेगळा पोळ्याचा सण साजरा केला.
याप्रसंगी उपस्थित येथील सर्व पदाधिकारी, जेष्ठ नागरीक, दिव्यांग बांधव, कामगार बांधव,निराधार बांधव, तसेच संपुर्ण शेतकरी-शेतमजुर बांधव व ग्रामवाशी उपस्थित होते.

