आष्टी पोलीस स्टेशनचे पहिले ठाणेदार उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन , वणी येथील रुग्णालयात केले होते उपचारासाठी दाखल
मारेगाव : येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर वय ५७ वर्षं रा .मारेगाव मुळ मुक्काम नागपूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दि २३ ऑगस्ट शनिवार सकाळी दहा वाजता निधन झाले. ठाणेदार बेसरकर यांच्या अकाली निधनाने पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.
यापूर्वी ते पुसदला कार्यरत होते गत दोन महिन्यापूर्वी १४ जून २०२५ रोजी मारेगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. तालुक्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांच्यात सातत्य होते.मनमिळावू स्वभाव आणि न्यायिक भूमिकेने त्यांचा सूस्वभाव मारेगावकरांसाठी औटघटकेचा ठरल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज कर्तव्यावर असतांना अचानक छातीत दुखू लागले. तात्काळ मारेगाव येथे प्राथमिक उपचारा नंतर वणी येथे हलविण्यात आले. मात्र,उपचाराला प्रतिसाद न दिल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ठाणेदार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार असून शोकसागरात बुडाले आहेत

