चांदेश्वर(येणापूर ) येथे बैलपोळा शेतकरी बांधवांनी हर्षोल्लासात केला साजरा
प्रतिनिधी:- प्रमोद झरकर
येणापूर:-
येणापूर पासून जवळच असलेल्या चांदेश्वर येथे बैलपोला मोठ्या हर्षोल्लासात शेतकरी बांधवांनी साजरा केला
खट्याळ आणि तितक्याच रंजक झडल्या. एकमेकांवर काव्यात्मक झडत्यांची सरबती करुन शेतकऱ्यांनी आनंद व्दिगुणित केला तसेच प्रमोद झरकर यांनी गायनासह केलेल्या झडत्यांनी परिसर दणाणून टाकला प्रशस्त झडत्यांच्या शेवटी 'एक नमन गौरापार्वती, हर बोला हर हर महादेव असा गजर करून आनंदात भर पडली शुक्रवारला गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र बैलपोळा सण साजरा करण्यात आला आहे
शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी सदैव साथ देत असलेल्या त्या सर्जा-राजांला सजवून गावातील मंदिर परिसरात आणले जाते. हनुमान मंदिर परिसरात तसेच चांदेश्वर येथील मंदिर परिसरात आबालवृद्ध शेतक-यांचीही मोठी गर्दी होत असते. वर्षभर शेतात बळीराजासह राबणाऱ्या लाडक्या ढवळ्या-पवळ्यांन प्रती शेतकरी कृतज्ञता व निश्चीम प्रेम व्यक्त करण्यासाठी पोळा सन साजरा करतात. गावातील तोरण एका प्रमुख व्यक्तीनी कापल्यावर शेतकरी आपल्या ढवळ्या पवळ्यांना पुरणपोळीसह यथेच्छ भोजन घालून पुजन करुन सांगता केली

