धानरोपनासाठी शेतात चिखल करीत असतांना ट्रॅक्टर पलटी झाले, चालक जागीच ठार

0
धानरोपनासाठी शेतात चिखल करीत असतांना ट्रॅक्टर पलटी झाले, चालक जागीच ठार 


 
एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी येथील घटना 

एटापल्ली:-
 आपल्या शेतात धानरोपण करण्यासाठी ट्रॅक्टरने चिखल करीत असतांना ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी येथे घडली 
 बऱ्याच दिवसानंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या हंगामास जोमाने सुरुवात केली आहे अश्यातच एटापल्ली तालुक्यातील दिनांक २६ जुलै २०२५ रोजी दुपारच्या सुमारास अनील शेंडे  स्वतःच्या शेतात रोवणीच्या कामाकरीता ट्रॅक्टरने चिखल करीत असतांना ट्रॅक्टर उलटल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


 अनिल शेंडे हे ऐटापल्ली तालुक्यातील वाघेझरी ग्रामपंचायत मध्ये ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. ट्रॅक्टर पलटल्यामुळे बराच वेळ ते ट्रॅक्टर खाली चिखलात दबून राहिले. बाजूच्या शेतातील मजुरांनी वेळीच धाव घेऊन शेजारच्या शेतात चिखल करीत असलेल्या दुसऱ्या दोन ट्रक्टरांना आणून ट्रॅक्टर उचलला व त्यांना बाहेर काढले तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता या घटनेमुळे गावात व एटापल्ली  तालुक्यात  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !