अंशी हजार रुपयाची बैल जोडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला मृत्यू
शेतकऱ्यावर अस्मानी संकट — शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी होत आहे मागणी
कुरखेडा :- अंशी हजार रुपयाची बैल जोडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा नजीकच्या चरवीदंड येथील रहिवाशी रतिराम सखाराम हलामी यांच्या मालकीची बैल जोडी पुराच्या पाण्यात वाहून गेली व मृत्यू झाला असल्याचे शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा नजीकच्या चरवीदंड येथील शेतकरी रतीराम सखाराम हलामी वय ४२ वर्ष हे आपल्या शेतावरून बैलजोडी घेऊन घरी येत असताना नेवासा काटेंगे यांच्या शेता जवळील नाल्याला पूर आल्याने नाल्याच्या पुलांवरून येत असताना बैलाचा पाय घसरल्याने बैल पाण्यात पडला दोन्ही बैलांची जोडी बांधली असल्याने दुसराही बैल पुरात वाहत गेला.
रतीराम याने आरडा ओरड केल्या नंतर गावातील काही इसम धाऊन आले व मदत करून बैलांना बाहेर काढण्यात आले पण दोन्ही बैल मृत्यू पावले असल्याने त्या शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे.गेल्या वर्षीच रुपये अंशी हजारला ही बैल जोडी खरेदी केली होती हे विशेष.
अचानक आलेल्या पुराने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले असल्याने व रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे व शेती कशी करावी या विवंचनेत ते आहेत तरी रतीराम यांना लवकरात लवकर शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे

