रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

0
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार



गोंडपिंपरी -:
चंद्रपूर मार्गावरील आक्सापूर गावाजवळ एका अज्ञात वाहनाचा धडकेत बिबट्याचा अंत झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार २७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली.
जंगलाच्या मार्गात भरधाव वेगात वाहने धावत असल्याने ही घटना घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास गोंडपिंपरी चंद्रपूर मार्गावर बिबट्या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली त्यामध्ये बिबट्या जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी बिबट्या मृतावस्थेत पडलेला होता.
वन अधिकारी व कर्मचारी बिबट्याला धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या प्रकरणी अनोळखी वाहन चालक याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !