वैनगंगेच्या पुरात वाहून आलेल्या अनोळखी इसमाचे जैरामपूर येथे आढळले प्रेत
आष्टी :-
चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या कोनसरी येथील प्लांटच्या हॅड्रॉन जवळ पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका इसमाचे प्रेत आढळून आले आहे. ही घटना आज दि २५ जुलै ला दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल काळे हे पोलिस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले
पोलिसांनी सदर प्रेत नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल केले.
मयत इसम हा ३० ते ४० वर्षाचा आहे.सदर घटनेची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार राऊत व त्यांची टीम यांनी घटनास्थळी भेट दिली .
सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. हे पुरात वाहुन आलेले इसम कोन याचा पोलीस शोध घेत आहेत

