आत्महत्या करण्यासाठी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या युवकास वाचवले राज्य व्यवस्थापन समितीच्या चमुने
गडचिरोली कठाणी नदि पात्रातील संध्याकाळची घटना
गडचिरोली : आत्महत्या करण्यासाठी एका युवकाने दि १९ जूलै शनिवारला संध्याकाळी गडचिरोली शहरालगतच्या कठाणी नदीवरील पुलावरून नदिपात्रात खाली उडी मारली. पण तो पाणी कमी असलेल्या भागात पडला. जखमी अवस्थेत तो नदीपात्रात पडून असताना गडचिरोली पोलिसांनी एसडीआरएफ चमुच्या मदतीने अंधारातही शोध घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याचा जीव वाचवीला.
हा थरार शनिवारी संध्याकाळी कठाणी नदीच्या मोठ्या पुलाजवळ घडला. आत्महत्येचा प्रयत्न करणारा तो युवक शहरातील गोकुळनगरातील रहिवासी असून त्याचे नाव प्रितम असल्याचे सांगण्यात येत आहे
प्रितमने मोठ्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. यावेळी कोणीतरी त्याला पाहिले. त्यामुळे गडचिरोली पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नदीपात्रात उडी मारताच प्रितम पात्रातील रेतीवर पडला होता. गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तत्परता दाखवत राज्य आपत्ती प्रतिसाद चमुला (एसडीआरएफ) माहिती दिली आणि पोलिसांची चमु लगेच कठाणी नदीकडे रवाना झाली. अंधार पडलेला असल्याने बॅटरीच्या उजेडात आणि मोटारबोटने सहाय्याने जाऊन पथकाने प्रितमला नदीपात्रातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही

