वैनगंगा नदी पुलावरील खड्डा देतोय अपघातास निमंत्रण ,उद्घाटन पुर्वी जळ वाहतुकीची दळणवळण
नवीन पुलावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
आष्टी :-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीचा नवा पूल वाहतुकीस सूरू करण्यात आला वर्षभराचा कालावधी झाला आहे. मात्र वर्षभरातच पुलाच्या मध्यभागी खोलगट खड्डा पडला असुन हा खड्डा चुकवितांना अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. सदर खड्डा जीवघेणा ठरत असतांना खड्डा बुजविण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पुलाचे बांधकाम होवून वर्षभराचा कालावधी लोटत नाही तोच पुलावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चामोर्शी तालुक्यातील आष्टी-चंद्रपूर हा मार्ग अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरुन दोन्ही जिल्ह्यातंर्गत नियमित वाहतूक सुरु असते. याच मार्गावरील वैनगंगा नदी पुलावर वर्षभरापूर्वी नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करीत या पुलावरुन वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र वर्षभरातच या पुलाच्या मध्यभागी खोलगट खड्डा पडल्याने वाहतूकदारांना कमालीचा मनस्ताप सहन करावाल लागत आहे. सदर खड्डा चुकवितांना अनेक दुचाकी वाहनांना किरकोळ अपघातही घडले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून या खड्यामुळे कुणाचा अद्याप जीव गेला नाही. मात्र हा खड्डा जीवघेणा ठरण्याची शक्यता बळावली आहे
याकडे संबंधित विभागाने मात्र, कमालीचे दुर्लक्ष होत आहे. या खड्यामुळे कुणाचा जीव गेल्यानंतरच खड्डा बुजविनार का असा सवाल वाहतूकदारांसह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने याकडे तात्काळ खड्डा लक्ष केंद्रित करून बुजवावा अशी मागणी करण्यात येत आहे.

