सूरजागड कंपनीच्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे व धुळीमुळे जनजीवनावरील आरोग्याचे परिणाम रोखणार काय?

0
सूरजागड कंपनीच्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे व धुळीमुळे जनजीवनावरील आरोग्याचे परिणाम रोखणार काय?

रस्त्यालगतच्या असलेल्या गावातील जनतेची मागणी



वैनगंगा वार्ता/ ता. प्रतिनिधी श्रीकृष्ण गावडे

मुलचेरा:-
तालुक्यातील लगाम परिसरातील सुरजागड वाहनांच्या वाढत्या कर्णकर्कश आवाजामुळे व धुळीचे परिसरातील रहिवाशांचे जीवनावर आरोग्य विषयक परिणाम होत आहेत ते रोखण्यासाठी कंपनीने प्रयत्न करावे अशी मागणी परिसरातील रस्त्यांवर असलेल्या जनतेनी केली आहे 
 रस्त्याच्या कडेला असलेल्या गावांमध्ये, शाळांमध्ये आणि दुकानामध्ये धुळीचा आणि वाहनांच्या आवाजाचा त्रास वाढला आहे. या समस्या नेहमीच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम करीत असल्याने जनता त्रस्त झाली आहे 

सूरजगड कंपनीतील वाहनांची संख्या वाढल्याने आणि वाहनांची नीटनेटकी देखभाल न केल्यामुळे परिसरात आवाजाचा आणि धुळीचा प्रदूषण फारच वाढला आहे. या भागातील रहिवाशांनी म्हटले की, “रस्त्यावरून सतत येणाऱ्या वाहतुकीमुळे आम्हाला झोप तर लागतच नाही. शाळांमध्ये बालकांचे शिक्षणही प्रभावित होत आहे” अशी तक्रार त्यांनी केली. व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी देखील यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येते कारण धूळेखालील परिसरामुळे त्यांच्या वस्तूंचा दर्जा कमी होतो त्यामुळे दुकानदारांचे नुकसान तर होतच आहे 

या समस्येचे मूळ कारण म्हणजे सूरजगड कंपनीच्या मालकीच्या अथवा परवानाधारक वाहनांच्या नियमावलीचे उल्लंघन आणि कालबाह्य, धूळ उडवणारी वाहने. या वाहनांमुळे परिसरातील हवा अत्यंत प्रदूषित होत असल्याबाबत पर्यावरणतज्ञही चिंतित आहेत. ते म्हणतात की, “शहरी व ग्रामीण भागांमध्ये अशा धुळीच्या आणि आवाजाच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ शकतात, त्यामुळे प्रशासनाने तातडीने यावर नियंत्रण आणले पाहिजे. 
निगरगठ्ठ प्रशासनाकडे सूरजगड कंपनीच्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी नागरिकांनी मागणी सुरू केली आहे. काही आंदोलकांनीही या समस्येची लोकशहभागी तक्रार केली असून, प्रशासनाने तरतूद करत वाहने नियमबद्ध करण्याच्या योजना आखल्या आहेत मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही अधुरी दिसते.

सूरजगडच्या वाहनांच्या आवाजामुळे या परिसरात निर्माण झालेली समस्या रस्त्याच्या कडील सर्व गावांमध्ये एक मोठा सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न ठरली आहे. यामुळे परिसरातील लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे तर पर्यावरणीय प्रदूषणातून आरोग्यविषयक प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे.
या बाबतीत शासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत अशीही मागणी जोर धरू लागली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !